राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगारदिनी संयुक्त महाराष्ट्रास ६५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने 'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५', या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित, 'महाराष्ट्र गौरव रथयात्रा' चे उद्या, बुधवार, दि. ३० एप्रिल २०२५ रोजी आगमन होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या – चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यात्तील प्रातिनिधीक स्वरूपात काही हुतात्म्यांची रथयात्रेच्या माध्यमातुन हुबेहूब वेशभूषा प्रधान करणार आहे व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून जाज्वल्यरुपी ऐतिहासिक क्षणांच्या स्मरणार्थ आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, या अनुषंगाने या संकल्पनेचे सादरीकरण करून संदेश देण्यात येणार आहे. सदर रॅली व रथ यात्रेचे मार्गक्रमण पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, नागरी वस्तींमधून असणार आहे. सदर रथयात्रेचे मार्ग व वेळ पुढीलप्रमाणे
सकाळी:- १०:०० वा. फिरंगाई माता मंदिर, दापोडी, पुणे,
सकाळी :- १०:३० वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लांडेवाडी, भोसरी. नेहरुनगर मार्गे-
दुपारी:- ११:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी, पुणे.
दुपारी :- १२:०० वाजता, पिपरी साई चौक- एम.एस.ई.बी. चौक-
दुपारी :- १२:१५ वाजता नव महाराष्ट्र विद्यालय - छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपरी गाव- गणेश हॉटेल जय हिंद स्कूल –तपोवन मंदिर रोड -
दुपारी :- १२:३० काळेवाडी पाचपीर चौक- काळेवाडी- एमजीएम स्कूल-चिंचवडगाव- मोरया हॉस्पिटल चौक.
दुपारी :- ०१:०० चिंचवडगाव चाफेकर चौक- वाल्हेकर वाडी- शुभम गार्डन-उजवीकडे- स्पाईन रोड- भेळ चौक-
दुपारी :- ०२:०० भक्ती शक्ती चौक- समारोप होईल.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त यंदा ६५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त "गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५" गुरुवार दिनांक ०१ मे ते ०४ मे २०२५ रोजी आजी झांबोरी मैदान वरळी मुंबई या ठिकाणी सायंकाळी चार ते दहा पर्यंत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचे सन्मान करण्यात येतील त्या मध्ये प्रामुख्याने १)गर्जा महाराष्ट्र माझा (संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास), २) महाराष्ट्र धर्म (समाज सुधारणेची सांगड घालणारी संत परंपरेचे तेजस्वी दीपस्तंभ), ३) महाराष्ट्राचे विचार सूत्र (समता न्याय आणि प्रगतीसाठी लढणारे प्रेरणादायी महापुरुष), ४) महाराष्ट्र रत्न (विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या गौरवशाली व्यक्तिमत्त्वांची ओळख), ५)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (दूरदृष्टी निर्णय क्षमता आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेतृत्वांचा गौरव) यामध्ये प्रामुख्याने आज तागायत राज्यात नेतृत्व केलेल्या सर्व माजी मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ या कार्यक्रमामुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे व विचार पोहोचविण्यात मदत होणार आहे, तसेच बाईक रॅली वरती यात्रेची माध्यमातून संपूर्ण शहरात सकारात्मक वातावरण निर्मिती होणार आहे.
सदर रथयात्रा व रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष, आमदार अण्णासाहेब बनसोडे तसेच शहराध्यक्ष योगेश बहल तसेच शहरातील आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.