प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात आंदोलन होणार!

प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात आंदोलन होणार!
पुणे : म.जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित येणाऱ्या फुले या चित्रपटावर अनेक ब्राह्मण्यवादी संघटनांनी विरोध केल्याने ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा म.फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तसेच सेन्सॉर बोर्डाकडूनही ह्या चित्रपटात अनेक सिनला कात्री लावण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेला अनुसरून महात्मा फुलेंच्या या अपमानावर आम्ही गप्प बसणार नाही. उद्या ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी फक्त त्यांची जयंती साजरी करणार नाही, तर पुण्यात सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध निषेध आंदोलन करणार, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या संदर्भातील ट्विट करत त्यांनी माहिती दिली.
 
उद्या सकाळी 11 वा. महात्मा फुले वाडा येथे हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
 
 म.फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सिनेमात ऐतिहासिक दृष्ट्या अनेक महत्त्वाच्या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेऊन ते काढायला सांगितले आहे, जे इतिहासाला धरून नाहीत. या संदर्भातील सेन्सॉर बोर्डाचे पत्र सुद्धा वायरल होत आहे.