महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त बालसभांचे आयोजन

महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त बालसभांचे आयोजन
पनवेल,दि.26: पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरूवार 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून मनपाच्या सर्व शाळांमध्ये बालसभेचे आयोजन करण्यात आले. 
 
या निमित्त सर्व शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.फ त्यानंतर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाचा परीचय माहितीच्या रूपाने,गोष्टींच्या रूपाने सांगण्यात आला. 

 
 शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणा-या सर्व उपक्रमांचे नियोजन केल्याप्रमाणे या बालसभांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्याबाबतच्या सुचना शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिलेल्या होत्या.त्यानूसार या बाल सभेचे नियोजन करण्यात आले.

 
 नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच बालसभेचे  पालिकेच्या सर्व शाळांनी यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल श्री.चव्हाण यांनी सर्व विद्यार्थी,शिक्षक व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले.