वाजेगाव येथे वाजू माता देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

वाजेगाव येथे वाजू माता देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

    (सातारा प्रतिनिधी) वाजू माता   देवीची पालखी मिरवणुकीला दुपारी  चार वाजता सुरुवात झाली व सात वाजता समारोप झाला यावेळी वाजेगाव व शिरसवडी मधील भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती,
यात्रेमध्ये विविध प्रकारचे पाळणे दुकाने कार्यक्रम या चे नियोजन केले होते 
देवीची पालखी सोहळ्यात गुलाल खोबऱ्याची उधळण करून फटाके डीजे च्या आतिश बाजेत पालखीला शानदार स्वरूप प्राप्त झाले, भक्तामध्ये उत्साहाचे आनंदाचे भक्तिमय  वातावरण पाहायला मिळाले, वाजू माता देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. 
वाजेगाव या गावाला  कोयना नदी लाभली आहे त्यामुळे हे गाव  देवीच्या कृपेने पूर्ण संपन्न आहे, रात्री आठ वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली पुरणपोळीचा महाप्रसाद मोठ्या प्रमाणात संपन्न झाला 
खास करून या यात्रेमध्ये शिरसवडी व वाजेगाव मधील तरुण मंडळांनी महत्वाचे कार्य केले