पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण, अरुंधतीताई शिरसाठ, धैर्यवान पुंडकर, फारुख अहमद, सिद्धार्थ मोकळे, सर्वजित बनसोडे, नागोराव पांचाळ, कुशल मेश्राम, गोविंद दळवी, अनिल जाधव, जितरत्न पटाईत उपस्थित होते.