स्वेरीत 'राष्ट्रीय मतदार दिन' संपन्न

स्वेरीत 'राष्ट्रीय मतदार दिन' संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतली लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ

पंढरपूर- महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,  सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये 'राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.  
    भारत देश हा युवकांचा देश असून १८ वर्षे पूर्ण झालेल्या वयोगटातील तरुण युवकांना नवचेतना देऊन  राष्ट्राच्या विकासाच्या दिशेने घेऊन जाणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. नव तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्याचा एक भाग म्हणून मतदान करण्याबाबत जागृत  करण्यासाठी त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे यासाठी स्वेरीमध्ये हा मतदार जनजागृतीचा उपक्रम घेण्यात आला. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ व इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एस.चौधरी, डॉ. एम.एम.आवताडे, प्रा. ए. बी.चौंडे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात  आली. शपथेचे वाचन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बी.चौंडे यांनी केले. यावेळी रासेयोचे अधिकारी प्रा. एन.एस. शिंदे, प्रा. ए.जी.इंगळे, प्रा. ए. एम. थोरात यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.