स्वेरीमध्ये सहा दिवशीय प्रशिक्षण संपन्न

स्वेरीमध्ये सहा दिवशीय प्रशिक्षण संपन्न

पंढरपूर- स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात नुकतेच ‘आयओटी फंडामेंटल्स: बिल्डींग स्मार्ट सोल्युशन्स इएसपी ३२ अँड आर्डीनो’ या विषयावर सहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उरण (मुंबई) येथील पीइएल रोबोटिक्सचे प्रकल्प अधिकारी प्रणीत भोईर व पीइएल रोबोटिक्सचे प्रशिक्षण समन्वयक विघ्नेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.


        गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात दि. ०३ मार्च ते दि. ०८ मार्च २०२५ पर्यंत हे सहा दिवशीय प्रशिक्षण संपन्न झाले. दिपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्रा.एम.ए.देशमुख यांनी सहा दिवसीय कार्यशाळा आयोजिन्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) हे महत्त्वाचे क्षेत्र असून ते कनेक्टिव्हिटी सक्षम करते. ऑटोमेशनद्वारे कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारते, माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी चांगला डेटा संकलन आणि विश्लेषण सुलभ करते. नाविन्यपूर्ण अनुप्रयोगांद्वारे दैनंदिन जीवन आणि विविध उद्योगांमध्ये सुधारणा होण्यास मदत करते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.सुमंत आनंद म्हणाले की, ‘आयओटी सेन्सर्सबद्दल शिकणे सध्या महत्त्वाचे आहे कारण हे मूलभूत घटक आहेत ज्यामुळे उपकरणांना भौतिक जगातून रिअल-टाईम डेटा गोळा करण्याची परवानगी मिळते. विविध उद्योगांमध्ये ऑटोमेशन, देखरेख आणि निर्णय घेण्यास सक्षम केले जाते आणि शेवटी स्मार्ट होम्स, औद्योगिक यंत्रसामग्री, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या विविध अनुप्रयोगांमध्ये नावीन्यपूर्णता आणि कार्यक्षमता सुधारते. या प्रशिक्षणामध्ये पीईएल रोबोटिक्सचे प्रकल्प अधिकारी प्रणीत भोईर व पीइएल रोबोटिक्सचे प्रशिक्षण समन्वयक विघ्नेश शिंदे यांनी आयओटी आणि इएसपी ३२, मूलभूत गोष्टींचा परिचय, आयओटी म्हणजे काय? अनुप्रयोग आणि वापर, आर्डीनो आणि इएसपी ३२ ची ओळख, इएसपी ३२ साठी आर्डीनो आयडीइ सेट ६ करणे, ब्रेडबोर्ड सर्किट मेकिंग समजून घेणे, इएसपी ३२ मध्ये डिजिटल आणि अॅनालॉग आयओची मूलभूत माहिती, सेन्सर इंटरफेसिंग आणि डेटा अधिग्रहण, डीएचटी ११ (तापमान आणि आर्द्रता सेन्सर) इंटरफेसिंग, एमक़्यु १३५ एमक्यु २ (गॅस सेन्सर) इंटरफेसिंग, बीएमइ २८० (दाब, तापमान आणि आर्द्रता) इंटरफेसिंग, आयआर सेन्सर आणि अल्ट्रासोनिक सेन्सरसह काम करणे, सीरियल मॉनिटर आणि एलसीडी १२ सी वर सेन्सर डेटा प्रदर्शित करणे, थिंग स्पीक वापरून आयओटी क्लाउड कनेक्टिव्हिटी, आयओटी क्लाउड आणि थिंग स्पीकचा परिचय, थिंग स्पीक खाते सेट करणे, थिंग स्पीकला इएसपी ३२ सेन्सर डेटा पाठवणे, थिंग स्पीक डॅशबोर्ड वापरून रिअल-टाइम डेटा व्हिज्युअलायझ करणे, ब्लिंक वापरून स्मार्ट होम ऑटोमेशन, ब्लिंक आणि आयओटी अॅप डेव्हलपमेंटचा परिचय, ब्लिंक क्लाउड आणि डॅशबोर्ड सेट करणे, ब्लिंक अ‍ॅप वापरून एलइडी रिले आणि बझर नियंत्रित करणे, एमआयटी अ‍ॅप इन्व्हेंटर, फायरबेस आणि ईएसपी ३२ वेब सर्व्हर,फायरबेस आणि रिअल-टाइम डेटाबेसचा परिचय, फायरबेस वापरून ईएसपी ३२ डेटा साठवणे आणि पुनर्प्राप्त करणे, आयओटी अ‍ॅप्लिकेशन्ससाठी एमआयटी अ‍ॅप इन्व्हेंटरचा परिचय, एमआयटी अ‍ॅप इन्व्हेंटर वापरून स्मार्ट होम कंट्रोल अ‍ॅप विकसित करणे, रिमोट कंट्रोलसाठी ईएसपी ३२ स्थानिक वेब सर्व्हर सेट करणे या सर्व विषयांवर द्वितीय वर्षातील जवळपास १५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी विभागातील इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्राजक्ता तुपारे यांनी काम पाहिले. प्रा. मनोज देशमुख यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.