सह्याद्री प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तब्बल ३० वर्षांनी एकत्र: जुन्या आठवणींना उजाळा

सोलापूर, देगाव रोडवरील, हौसे वस्ती येथील सह्याद्री प्रशालेतील १९९४- ९५ मधील दहावीचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या शिक्षकांचा स्नेहसंमेलन रामलाल चौकातील निसर्ग हॉटेलमध्ये संपन्न झाला. तब्बल ३० वर्षानंतर हे सर्वजण एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत हे संमेलन साजरे झाले.
हा कार्यक्रम सह्याद्री प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रा.जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी. शिक्षक, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे फॅमिली मेंबर उपस्थित होते.
३० वर्षानंतर विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान होतो हे शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे गौरव गौरवोदगार प्रा. शिवदास चटके, प्रा.श्रीमती शालिनी चव्हाण, प्रा.मोहन बारबोले, प्रा.सुधाकर देशमुख, प्रा.जाधव, प्रा. श्रीमती मानवी इत्यादी या प्रत्येक शिक्षकांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. तर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीनी गुरुजनांचा सत्कार त्यांचे चरण स्पर्श करून तसेच त्यांना शाल,श्रीफळ व छोटेसे रोपटे देऊन करण्यात आला हे पाहून शिक्षक वर्ग भारावून गेले. जीवनामध्ये शिक्षकांचा सन्मान राखला पाहिजे शिक्षकांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने गुरु शिष्य परंपरा म्हणजेच भारतीय संस्कृती जपून ठेवण्याची संधी आहे असे मत प्रा. शिवदास चटके यांनी मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सनातन पवार, श्रीनाथ लोंढे, सचिन बनसोडे, संजय माने, राजू ऐवळे, सोमशेखर मोरे, दत्ता कारंडे, श्रीकृष्ण कोकरे, ज्योतिबा पवार, संजय कदम, भाग्यश्री जाधव,जगदेवी भोसले, छाया मसलखांब,सुवर्णा कदम, अलका पाटील आदींनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.शालिनी सावंत यांनी मानले