नंदुरबार ते मुंबई मंत्रालय यशाची शिखरे गाठणारा प्रवास करणाऱ्या रणरागिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नंदुरबार ते मुंबई मंत्रालय यशाची शिखरे गाठणारा प्रवास करणाऱ्या रणरागिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 (मुंबई प्रतिनिधी)दि. 4 मार्च 2025 : अत्यंत गरीब आणि  दुर्गम असलेल्या जिल्ह्यातील म्हणजे नंदुरबार मधील एका छोट्या खेड्यातून जन्मणारी असे व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ रुपाली मनोज बैसाणे  यांचा 4 मार्च रोजी नंदुरबार येथे  पिंपळे कुटुंबात जन्म झाला.  जन्मापासून शिकण्याची आवड असतानाही  आई-वडिलांच्या घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे नेहमी मनात खंत वाटत होती. परंतु लग्नानंतर त्यांच्या पतीने  मनोज यांनी खंबीर साथ देत स्त्री शिकली म्हणजे समाज सुधारतो त्या म्हणी प्रमाणे आपल्या पत्नीला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीधर शिक्षण पूर्ण  केले. आणि पत्रकार क्षेत्रात येण्यास मोलाची मदत केली. त्यातच साप्ताहिक कृषिजल स्वराज्य बरोबर के. एस.  न्यूज चैनल मध्ये त्यांनी आपली पत्रकारिता सुरू केली .परिसरात होणाऱ्या घडामोडी व परखंड लेखन केले ,आणि आपला असा वेगळा ठसा जनमाणसात उठवला. मुंबई कांदिवली विभागातून थेट मंत्रालयात यशस्वी भरारी करण्याच्या  उद्देशाने सामाजिक कार्य बरोबर पत्रकारिता वसा घेतल्यामुळे, आपला नावाचा व लिखाणाचा धबधबा कायम ठेवला. त्या हरहूनरी असलेल्या रणरागिणीचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

शुभेच्छुक : के एस न्यूज परिवार