धर्मादाय संस्थांचे ऑडिट दाखल करण्यास मुदतवाढ

राज्याच्या धर्मादाय कार्यालयाच्या मुंबई येथील मुख्य संकेतस्थळाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे सनदी लेखापालांकडून धर्मादाय संस्था आणि ट्रस्टचे लेखापरीक्षण झालेले वार्षिक हिशोबपत्रके (ऑडिट रिपोर्ट) ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यास लेखापरिक्षक व संस्था चालकांना तांत्रिक अडचणी येवू नये यासाठी महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ श्यामकांत कलोती यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ सालाचे हिशोबपत्रके दाखल करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविली आहे.
या बाबतचे परिपत्रक क्र. ६२० हे एकोणीस सप्टेंबर रोजी निर्गमित झाले असून त्यामुळे ही मुदत एक महिन्याने वाढली आहे. ट्रस्ट कायद्या नुसार आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्यात म्हणजेच तीस सप्टेंबर पर्यंत वार्षिक हिशोबपत्रके सादर करायची असतात. या वेळी आयकर कायद्या प्रमाणे ऑनलाइन रिटर्न भरण्यास सुद्धा सर्वर सेवा सुरळीत न्हवती. त्यामुळे आयकर खात्याकडे सादर केलेली वार्षिक हिशोब पत्रके धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य असल्याने असे दाखल करायच्या हिशोबपत्रकांची मुदत ऑक्टोबर अखेर वाढवली आहे.
मुंबईतील मुख्य सर्वरचे नूतनीकरण व त्याची क्षमता वाढविणेचे काम सुरू असल्याने संपूर्ण राज्यातील ट्रस्ट व संस्था नोंदणी तसेच वार्षिक हिशोबपत्रके अपलोड करण्यास तांत्रिक अडचणी येवू नये यासाठी ही मुदत वाढवणे अत्यंत गरजेचे होते .
एड. शिवराज कदम जहागिरदार
माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे