डोक्यात दगड घालून खुन...तीन आरोपींना न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

डोक्यात दगड घालून खुन...तीन आरोपींना न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
इसम नामे प्रमोद ऊर्फ बंटी दिलीप जाधव याने मोसीन मोबीन शेख यास दारू पिणेकरीता सोबत घेवून जावून, तू आमच्या सोबत सतत वाद घालतो या कारणावरून त्यास दारू
पाजून त्याच्यासोबत भांडण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यावेळी प्रमोद यास त्याचे इतर साथीदार अक्षय ऊर्फ प्रकाश भाऊसाहेब ओव्हाळ व बाबू ऊर्फ रंणजित रमेश दळवी यांनी मदत करून, खुन केलेल्या मोसीन शेख याचा मोबाईल व पाकीटामधील पैसे घेवून तेथून पळून
गेलेबाबत देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४३/२०१६ भारतीय दंड विधान कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरहू गुन्हयातील वरील तीनही आरोपींना अटक करुन, गुन्हयाचे तपासाअंती तत्कालीन पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. गुन्हयाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केल्यानंतर सदरहू गुन्हयाचा खटला माननीय डी. के. अनभुले, अतिरीक्त सत्र न्यायाधीश- १ वडगाव मावळ कोर्ट पुणे यांच्या कोर्टामध्ये चालू होता. सदरहू खटल्यामध्ये सरकारतर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकूंद चौगुले यांनी काम पाहिले. मा. न्यायालयात सदर खटल्यामध्ये वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह
साक्षीदारांची साक्ष घेवून भक्कम पुरावे सादर केल्याने माननीय न्यायालयाने साक्षी पुरावे व
युक्तीवादाचे आधारे आरोपी १) प्रमोद ऊर्फ बंटी दिलीप जाधव, २) अक्षय ऊर्फ प्रकाश भाऊसाहेब ओव्हाळ, ३) बाबू ऊर्फ रंणजित रमेश दळवी यांना जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ.शशिकांत महावरकर साो. पोलीस सह आयुक्त, मा. सारंग आवाड साो. अपर पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा. विशाल गायकवाड साो. पोलीस उपायुक्त, परि-२, मा. बाळसाहेब
कोपनर सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग यांचे अधिपत्याखाली तसेच विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहुरोड पो.स्टे. यांचे सुचनेनुसार देहुरोड
पोलीस स्टेशनकडील श्रेणी पोलीस उप निरीक्षक अमृत निंबाळे, महिला पोलीस हवालदार आशा घाटे, पोलीस शिपाई सचिन पतुरे यांनी काम पाहिले आहे.