पुणे शहरात अवैध धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सतो, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, श्री. मानसिंग पाटील यांनी तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
वरिष्ठांनी दिलेले आदेशाप्रमाणे दिनांक ११/०६/२०२५ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कंजारभाट वस्ती, संतोषनगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, पुणे येथे बांधकाम चालु असलेल्या बिल्डिंग जवळ एक इसम दारुचा साठा करुन लोकांना दारुविक्री करीत आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस स्टाफ यांनी सापळा रचून हातभट्टी दारु अनुयावर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु विक्री करणारा इसम नामे नवीन दिलीप बिनायत, वय ५४ वर्षे, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे यास ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ५३ कॅन व एक बॅरल मध्ये भरुन ठेवलेली २०६५ लिटर तयार ४,१३,०००/- रु. किंमतीची हातभट्टीची दारु इ. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२५/२०२५ भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार वाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे, परशुराम पिसे यांचे पथकाने केली आहे.