महाराष्ट्र शासनाचे महसुल, वन विभाग व पोलीस स्वात्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ नोकरीचे अमिष दास्ववून अनेक नागरीकांना लुटणारा भामटयास गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद.

महाराष्ट्र शासनाचे महसुल, वन विभाग व पोलीस स्वात्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ नोकरीचे अमिष दास्ववून अनेक नागरीकांना लुटणारा भामटयास गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद.
बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रंमाक १०६/२०२५ बी एन एस कलम ३१६/२,३१८,३१९, मधील फिर्यादी नामे श्री सुरज कैलास पाचपुते वय २२ वर्ष धंदा शिक्षण रा मुं पो काष्टी स्टेशन गाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याचे तक्रारीवरुन इसम नामे महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फैलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड पुणे याने तो स्वता महसुल सचिव असल्याचे भासवून सन २०२२ ते २०२५ दरम्यान पुणे शहर व परिसरात पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती देतो म्हणून विश्वास संपादन करुन १० लाख रु घेवुन फसवणुक केले बाचत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
 
सदर आरोपी हा रियल इस्टेट एजंट म्हणून काम करीत असताना कामानिमीत्त शासकीय ऑफीसेस मध्ये जाणे येणे असल्याने त्याला शासकीय कामकाज च नोकरी व त्याच्या नियुक्तीचाचत ज्ञान झाल्याने सदर शासकीय कार्यालयातील त्याच्या नियमीतच्या चावराने तेथील येणा-वा जाणा-या लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देवू लागला त्यामध्ये तो ब-याच लोकांना शासकीय अ वर्ग, च वर्ग, क वर्ग पदावर नियुक्ती व नेमणुका करुन दिली आहेत असे भासवून आरोपीने सन २०२२ ते २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील सुमारे २० ते ३० नागरीकांकडून १ लाख रु पासून २० लाख रु. पर्यंत वेगवेगळया रक्कमा घेवुन महसुल पोलीस व वन विभागात नोक-या देण्याचे अमिष दाखवून त्यांची फसवणुक केलेचे शक्यता असून त्याचेकडून महाराष्ट्र शासनाचे शिक्क्यांचे वापर करुन लेटर पेंडवर महसुल, पोलीस व वन विभागात विविध उमेदवार यांना नेमणुका बाबत पत्रे ओळखपत्रे, विविध शासनाच्या शिक्यांचे पत्रे, शासकिय चिन्हांचा वापर करुन स्वताचे नावाने शासकिय अधिकारी असल्याचे भासवणा-या डाय-या, शासनाचे सेवापुस्तके, शासनाचे ओळखपत्रे, विविध बँकांचे चेक्स बुक्स व कार्ड शासकिय शिक्के असा दस्ताऐवज हस्तगत करण्यात आलेला आह. यामध्ये अनेक नागरीकांना नोकरीचे अमिष दाखवुन फसवणूक केल्याची शक्यता दिसून येते तसेच सदर गुन्हयाचे तपासामध्ये महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारे रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे याचा गुन्हयात उमेदवारांची नियुक्तीपत्र बनवून देण्यामध्ये सहभाग असलेवाचत निष्पन्न झाले असून त्यासदेखील ताच्यात घेण्यात आले आहे गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
 
अशाप्रकारे वरील आरोपीतांनी महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयातील नागरिकांना नोकरीचे अमीष दाखवून गंडा घातला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येल आहे.
 
सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार सो, मा सह-आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा साो, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनिअमोल रसाळ, पोउपनिरी नितीन कांबळे, पोलीस हवालदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, अमोल सरडे, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, हनुमंत काचंळे, गणेश थोरात, विजय पवार, राहुल शिंदे व नागेश राख यांनी केली आहे.