सदरबाचत अधिक माहिती अशी की, आज रोजी बिद्ययेवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे कमलाकर लक्ष्मण माशाळे यांनी सकाळी ०७/५० वा. चे सुमारास पोलीस स्टेशन येथे येवून कळविले की, त्यांची मुलगी नाने दिव्या कमलाकर माशाळे वय ८ वर्षे ही सकाळी ०६/४५ वा. बाहेर खेळत असताना अचानक ती दिसून येत नसल्याने आम्ही सुमारे ०१ तासापासून तीचा शोध घेत असून ती सापडत नसल्याचे कळवळे. लागलीच घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी सदर ठिकाणी भेट देवून, त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपास पथकातील अमंलदार व दोन्ही बिट मार्शल तसेच सी.आर. मोचाईलवरील अंमलदार यांना वेगवेगळ्या दिशेस रवाना केले. ज्या भागातून ते बालीका जात आहे ते फुटेज तपासून त्या परिसरात शोध घेतला असता सदर बालीका ही यशराज गार्डन जवळील निर्जनस्थळी एकटीच रडत असल्याचे दिसून आल्याने सदर बालीकेस ताब्यात घेवून आई वडीलाच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. त्यावेळी उपस्थित आई वडील व परिसरातील नागरीक यांनी पोलीसांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, बिट मार्शल पो. अंमलदार ७७९ पवार, पो.अं. ३७८५ गजेवाड, महिला पो.अं. ९५ घारे, महिला पो.अं. १६७ शेलार तसेच सी.आर. मोचाईलवरील महिला पो. अं. २७ पाटील, २४८ मुलाणी, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव यांनी केली आहे