गोवा बनावट दारूचे ३०५ बॉक्स
व सहाचाकी वाहनासह रु. ५२,२८,८००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त "
पुणे प्रतिनिधी
दि.१५/०५/२०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख साहेब, मा. सह-आयुक्त अंमलबजावणी व दक्षता श्री. पी. पी. सुर्वे साहेब, मा. विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग पुणे श्री.सागर धोमकर साहेब, मा.अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. चरणसिंग राजपुत साहेब, व मा. उप-अधीक्षक, पिंपरी चिंचवड श्री. सुजित पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करणेकामी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे यांनी जुना पुणे-मुंबई हायवे,
वल्लभनगर, बस स्थानकाच्या विरूध्द बाजूस, हायवेवर, पिंपरी, पुणे येथे वाहनाची तपासणी करीत असताना बातमीप्रमाणे EICHER कंपनीचे सहा चाकी वाहन क्र. MH-15 - JC - 1388 थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवाराज्यात निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे एकूण ३०५ बॉक्स मिळून आले. सदरचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे. सदर मद्याची महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठीची किमंत रु.२४,८८,८००/- (अक्षरी- चौवीस लाख अठ्ठयाशी हजार आठशे रुपये) इतकी असून जप्त वाहनाची किमंत रु.२७,४०,०००/- इतकी आहे. जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल रु. ५२,२८,८००/- इतका आहे. जप्त मुद्देमालासह आरोपी नामे विशाल सुकलाल वराडे, वय - ३१ वर्ष, रा. नशेराबाग, कुर्था, भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र- ४२५३११ यास अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई करीता निरीक्षक श्री. संजय के. कोल्हे, दुय्यम निरीक्षक श्री. अभय अ. औटे, श्री.बी.जी.रेडेकर, श्री.गणेश पठारे, व कर्मचारी वर्ग सर्वश्री प्रमोद पालवे, विजय घंदुरे, अमोल कांबळे, महिला जवान प्रिया
चंदनशिवे, यांनी भाग घेतला. पुढील तपास श्री. अभय अ. औटे दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत. परराज्यातील निर्मित व विक्री करीताच्या मद्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल चुकविला जातो. अशा प्रकारची
कारवाई या विभागाकडून वेळोवेळी याअधीही करण्यात आलेली आहे. तसेच अशा प्रकारची कारवाई या पुढेही सतत चालू राहील अशी माहिती मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री चरणसिंग राजपुत साहेब यांनी दिली तसेच यांचेकडून असेही आवाहन करण्यात येते की, बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणा-या व्यक्तींची माहीती स्थानीक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांचे कार्यालयीन क्र. ०२०-२६१२- ७३२१ यावर कळवावे. तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात
कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटसअप क्र.८४२२००११३३ यावर संपर्क साधावा.