स्वेरीच्या रा.से.यो. स्वयंसेवकांची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

स्वेरीच्या रा.से.यो. स्वयंसेवकांची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

पंढरपूर: राज्यस्तरीय ‘उत्कर्ष - २०२६’ या सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा संघ निवडला गेला होता. त्यामध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील पियुष सुनील चोपडे व गौरी शिवलिंग महाजन या दोन राष्ट्रीय सेवा योजनेच्या (रा.से.यो.) स्वयंसेवकांची निवड झाली होती. त्यात पियुष चोपडे यांना विविध उपक्रमात तब्बल सहा पुरस्कार मिळाले यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

             या सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणार्‍या पियुष सुनील चोपडे यांनी स्ट्रीट प्ले (ग्रुप इव्हेंट) स्पर्धेत प्रथम क्रमांक, काव्य वाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तसेच सांस्कृतिक रॅली स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना निदेशालय, भुवनेश्वर यांच्या वतीने रा.से.यो. स्वयंसेवकांसाठी ओरिसा राज्यातील बारीपदा मधील महाराजा श्रीरामचंद्र भंजदेव (एमएसबीबी) युनिव्हर्सिटी येथे दि.२२ फेब्रुवारी ते दि. २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय एकत्रीकरण शिबीर (एनआयसी) या राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर मधील पियुष सुनील चोपडे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघामध्ये निवड झाली होती. या शिबिरामध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये पियुष चोपडे यांनी सांघिक चर्चा (ग्रुप डिस्कशन) मध्ये द्वितीय क्रमांक, एक्सटेम्पोर मध्ये द्वितीय क्रमांक, तसेच रील मेकिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. याशिवाय राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (एनवायपीएफ)- २०२६ साठी दि. १० मार्च २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे झालेल्या अंतिम जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील पियुष चोपडे व सोनाली कांबळे या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय (मुंबई) स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ रा.से.यो. विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, पंढरपूर विभागाचे रा.से.यो. विभाग प्रमुख डॉ. संजय मुजमुले, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. पी. ए. सातारकर, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी स्वेरीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पियुष चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य बी.पी.रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.