जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत मा तहसिलदार साहेब अक्राणी यांना निवेदन.

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत मा तहसिलदार साहेब अक्राणी यांना निवेदन.

अक्राणी: सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मा तहसिलदार अक्राणी यांना जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले असून दि. २२/०४/२०२५ रोजी दहशतवाद्यांकडून जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे धर्म विचारुन विविध राज्यातून आलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांकडून अमानुषपणे करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यात २८ हिंदू पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी पर्यटकांना तुमचा धर्म कोणता असा प्रश्न केला आणि पर्यटक हिंदू असल्याचे खात्री झाल्यावर त्यांचावर बेछूट गोळीबार करण्यात आला. या दहशतवाद्यांना खत पाणी घालणा-या पाकिस्तानच्या भूमिकेची चौकशी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर कारवाई करण्यात यावी.निघृणपणे सक निष्पाप हिंदू पर्यटकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांवर सरकारकडून प्रति कारवाई होऊन त्यांना अद्दल घडवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करतो व भ्याड हल्ला करणा-या दहशतवाद्यांच्या व त्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानच्या तीव्र शब्दांत निषेध करतो.