मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी "१०० दिवसांचा कार्यक्रम" अंतर्गत सर्व शासकीय कार्यालये व परिसर यांची स्वच्छता व सुशोभीकरण करणेबाबत लक्ष्य दिल्याने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, विविध शाखा यांचे निरीक्षण केले त्यामध्ये पोलीस ठाणे, शाखा आवारात वर्षानुवर्षे पडून राहीलेल्या बिनधनी बेवारस वाहनांमुळे पोलीस ठाणे, शाखा येथील मोठी जागा व्यापली होती, तसेच काही पोलीस ठाणेच्या बाहेर जागे अभावी रस्त्याचाही काही भाग व्यापला असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिक, तक्रारदारांची गैरसोय होत होती व पोलीस ठाणेस अतिशय बकाल स्वरुप आले होते. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी "१०० दिवसांचा कार्यक्रम" कालावधीत सदर सर्व बिनधनी/बेवारस वाहनांचा लिलाव करुन, सर्व पोलीस ठाणे व शाखा यांची स्वच्छता करुन, नागरीक, तक्रारदार यांना पोलीस ठाणेस आल्यावर प्रसन्नत्ता वाटेल व त्यांची गैरसोय होणार नाही याबाबत वाहतुक शाखा यांनी सर्व पोलीस ठाणे, शाखा यांचेशी समन्वय साधून लिलाव प्रक्रिया पार पाडावी याबाबत आदेशित केले होते.
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचे १०० दिवसांचा कार्यक्रम" कालावधीच्या अनुषंगाने वाहतुक शाखेकडून पुणे शहरातील एकुण ३९ पोलीस ठाणे, शाखा, वाहतुक विभाग, इतर शाखा यांच्याकडे असलेल्या बेवारस वाहनांचे सुत्रबध्द रित्या माहिती संकलन करुन, योग्य नियोजन केले त्यामध्ये नमूद वाहनांचे वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्दी देवून, जाहीरनामा करुन, वाहनांचे मालक शोधण्याची मोहीम घेण्यात आली. मालक न मिळाल्याने सदर बेवारस/बिनधनी वाहनांबाबत मा. न्यायालयातून वाहनांचा नाश करणेबाबत आदेश प्राप्त करुन, मेटल स्क्रैप ट्रेड कॉपोरेशन (MSTC केंद्र शासन संलग्न संस्था) यांच्याकडून लिलावाची प्रक्रिया '१०० दिवस कालावधीत' पुर्ण करुन, नमुद एकुण ९६२ बिनधनी/वेबेवारस वाहनांचा दिनांक १९/०३/२०२५ रोजी ई-लिलाव पध्दतीने लिलाव करण्यात आला असून, नमुद कंपनीकडून दिनांक ०७/०४/२०२५ रोजी पासून वाहने ताब्यात घेवून पोलीस ठाणे, शाखा परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने कामकाज चालु असून दिनांक १३/०४/२०२५ पर्यंत सर्व वाहने स्क्रैप करिता रवाना करण्यात येत आहेत.
वरील उल्लेखनिय कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. अरविंद चावरिया, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १,२,३,४,५ पुणे शहर, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, विशेष शाखा, मुख्यालय, व श्री. अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा, सपोआ सुभाष निकम, प्रशासन वाहतुक शाखा, पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, येरवडा / खटला, वाहतुक विभाग, पुणे शहर, पोनि, प्रशासन, सुनिल गवळी सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर यांनी केली आहे.