हर घर तिरंगा अभियानास इंदापूरात उत्सर्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी रमेश ढगे

हर घर तिरंगा अभियानास इंदापूरात उत्सर्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी रमेश ढगे
पुणे, दि. 13: इंदापूर नगरपरिषदेच्यावतीने हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा व अभियानांतर्गत शहरात विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रमाचे आयोजित करण्यात आले, या उपक्रमास उत्सर्फूत प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली आहे. 
 
शहरात  ७ ऑगस्ट रोजी विद्या प्रतिष्ठान येथे वृक्ष लागवड, नागरिकांना “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा”अभियानाची माहिती देऊन देशभक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे स्वच्छता कर्मचारी यांचा गुणगौरव,  स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अमृत वाटिका येथे विविध संस्था, नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.नगरपरिषद कार्यालयापासून ४० फूट रोड –दर्गा मज्जिद चौक –नेहरू चौक – बाबा चौक मार्गे पुन्हा नगरपरिषद असा मार्ग घेत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. नारायणदास रामदास हायस्कूल येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. 
 
शहरात ११ ऑगस्ट नारायणदास रामदास हायस्कूल येथे राखी स्पर्धा आणि १२ ऑगस्ट रोजी नारायणदास रामदास हायस्कूल येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. नगरपरिषद प्रांगणात शहरातील बचत गट व महिला यांच्या सहभागातून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी स्वच्छता व देशभक्तीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्यांद्वारे सुंदर कलाकृती साकारल्या.
 
या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश देण्यात आले. हर घर तिरंगा, घरघर तिरंगा अभियानांतर्गत इंदापूर शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले आहे, अशी माहिती श्री. ढगे यांनी दिली आहे.