भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्यातर्फे आय.ए.एस. रघुनाथ गावडे व आय.ए.एस. श्रीधर डुबे-पाटील यांचा सन्मान
भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याकडून आय.ए.एस. रघुनाथ गावडे व आय.ए.एस. श्रीधर डुबे-पाटील यांचा सन्मान
मुंबई :
भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील दोन उच्चस्तरीय आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी — आय.ए.एस. श्री रघुनाथ गावडे (अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई) व आय.ए.एस. श्री श्रीधर डुबे-पाटील (व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई) — यांचा त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कारकिर्दीची आणि जनहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा जेष्ठ वकील व मार्गदर्शक आदरणीय श्री. विजयराव तापकीर सर यांच्या हस्ते, तसेच भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला.
दोन्ही अधिकारी यांनी त्यांच्या दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीत महसूल, मुद्रांक व नोंदणी, पुनर्वसन, सिडको, MMRDA अशा महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या विभागांत जबाबदारी सांभाळली आहे.
श्री रघुनाथ गावडे साहेब यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी परभणी या पदावर कार्यरत असताना विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून लोकमान्यता मिळवली. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक विभागाचे प्रमुख म्हणून अत्यंत दक्षता आणि पारदर्शकतेने काम पाहत आहेत.
तर श्री श्रीधर डुबे-पाटील साहेब यांनी प्रांताधिकारी, पुनर्वसन अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, मुद्रांक जिल्हाधिकारी, तसेच मंत्रालयात सहसचिव या पदांवर कार्य करत उत्कृष्ट सेवा बजाविली आहे. सध्या ते राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था — महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड — चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे पाच ते सहा लाख शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून सुमारे ₹५,००० कोटींचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले.
दोन्ही अधिकाऱ्यांच्या उत्तम प्रशासन, विकासात्मक उपक्रम आणि प्रामाणिक सेवाभावाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सन्माननीय उपस्थिती:
१️⃣ ॲड. कैलास विश्वनाथ पठारे-पाटील — अध्यक्ष, भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य
२️⃣ ॲड. पांडुरंग ढोरे-पाटील — उपाध्यक्ष, भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य
३️⃣ श्री. योगेश तुपे-पाटील — महासचिव, भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य
४️⃣ ॲड. सुरेश शिंदे — अध्यक्ष, एआयजे लिगल विंग, अहमदनगर
५️⃣ ॲड. प्रविण गोरे — अध्यक्ष, एआयजे लिगल विंग, सातारा
६️⃣ ॲड. राजू शेख — प्रतिनिधी, एआयजे लिगल विंग, मुंबई
कार्यक्रमादरम्यान आय.ए.एस. रघुनाथ गावडे साहेब यांनी “अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई” या पदावर केलेल्या कामकाजाचे मार्गदर्शन उपस्थितांना दिले, तसेच परभणी जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामांचा अनुभव शेअर केला.
आय.ए.एस. श्रीधर डुबे-पाटील साहेब यांनी “महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड” मधील कार्यपद्धती, शेतकरी कल्याण योजना आणि कृषी विकासाशी संबंधित उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सन्मान स्विकारताना त्यांनी सांगितले की त्यांनी एल.एल.बी. आणि डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्स फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण करून विधी व पत्रकारितेशी आपले नाते अधिक दृढ केले आहे.
या सोहळ्यात दोन्ही अधिकाऱ्यांना शाल, “ए.आय.जे. लिगल विंग महाराष्ट्र राज्य सन्मानचिन्ह” आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी दोन्ही अधिकारी साहेबांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.