मुंबई, ता. 5 : बिहारमध्ये एकेकाळी असलेले जंगलराज संपुष्टात आणून तेथे एनडीएचे सरकार आले. त्यामुळे तेथील जनतेला पुन्हा जंगलराज नको असून, विकासाच्या मुद्द्यावर मतदार मतदान करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या कांदिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी मदत केली. त्यामुळे राज्यात दुहेरी इंजिन सरकार आले आहे. देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे,” असे शिंदे म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सहा तारखेला (उद्या) होत असून, टप्प्यातील निवडणूक 11 तारखेला होणार आहे. जनता पुन्हा एनडीएसोबत उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “गुंडागर्दी आणि जंगलराज नको म्हणून जनता विकासाची निवड करीत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्यावर घणाघात करताना शिंदे म्हणाले, “राहुल गांधी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत. मोदी सरकारवर मतचोरीचा आरोप करणाऱ्यांनी आधी नोटचोरी केली आहे. मोदीजींसाठी नेशन फर्स्ट, तर विरोधकांसाठी करप्शन फर्स्ट आहे.”
बिहारची जनता विरोधकांना धडा शिकवून एनडीएला पुन्हा सत्ता देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लवकरच बिहार निवडणुकीमध्ये एनडीए च्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी स्वतः बिहारला जाणार असून, संजय निरुपम यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
तसेच पोईसर येथे गेली ५० वर्षे लोकं झोपडपट्टीत रहात असून क्लस्टर पुनर्विकास योजना राबवून सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन नक्की प्रयत्न करेल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच पोईसर नदी शुद्धीकरणासाठी इथे एसटीपी कार्यान्वित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत डीप क्लीन ड्राइव्ह मोहीम राबवून रस्ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न मी केला होता, पावसाने उघडीप दिल्यानंतर पोईसर परिसरातून या मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि शिवसेनेचे उत्तर भारतीय आघाडीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
[10:09 AM, 11/6/2025] Rupali Ks: __