चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने कांस्यपदक विजेता पृथ्वीराज विनोदे यांचा सन्मान

चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने कांस्यपदक विजेता पृथ्वीराज विनोदे यांचा सन्मान

चिंचवड :-वाकड येथील कु. पृथ्वीराज प्रशांत विनोदे याने लेह-लडाख येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये 500 मीटर आईस स्केटिंग लॉग ट्रॅक प्रकारात कांस्य पदक मिळवून पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक उंचावला आहे.
पृथ्वीराज विनोदे याने केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने, ट्रस्टचे अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे आणि शुभम चिंचवडे यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
पृथ्वीराज याला कठोर परिश्रम, जिद्द आणि मेहनतीमुळे हे यश मिळालं आहे, या ऐतिहासिक यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन..! आणि पुढील वाटचालीसाठी ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.