उद्योजक वैभव बाकलीवाल यांचे पहिल्याच रेटेड बुद्धिबळ स्पर्धेत 1812 FIDE रेटिंग

उद्योजक वैभव बाकलीवाल यांचे पहिल्याच रेटेड बुद्धिबळ स्पर्धेत 1812 FIDE रेटिंग
पुणे, प्रतिनिधी - पुण्याच्या जवळील मंचर येथे एका उच्चस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४ ग्रँडमास्टर, १ महिला ग्रँडमास्टर, १३६ रेटेड खेळाडू आणि एकूण २३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रबळ स्पर्धा पाहायला मिळाली, ज्यामध्ये ग्रँडमास्टर मित्रभा गुहा, ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक आणि आंतरराष्ट्रीय मास्टर कौस्तुव कुंडू यांनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला. त्यांनी प्रत्येकी ९ पैकी ८ गुण मिळवले.
या स्पर्धेत उद्योजक आणि बकलीवाल ट्युटोरियल्सचे संचालक वैभव बकलीवाल यांनी लक्षवेधी कामगिरी केली. बुद्धिबळाची आवड असलेल्या बाकलीवाल यांनी त्यांच्या पहिल्याच रेटेड स्पर्धेत ९ पैकी ६ गुण मिळवत १८१२ FIDE रेटिंग प्राप्त केले आणि ‘सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडू’चा पुरस्कार जिंकला. त्यांना यासाठी ट्रॉफी आणि ₹१०,००० रोख बक्षीस देण्यात आले. वैभव बाकलीवाल यांनी आपला पुरस्कार जीएम श्रीराम झा आणि जीएम सप्तऋषी रॉय चौधरी यांच्याकडून स्वीकारला. यावेळी जीएम मित्रभा गुहा, जीएम अभिमन्यू पुराणिक आणि डब्ल्यूजीएम स्वाती घाटे उपस्थित होते.  
 
सर्वसाधारणपणे उच्च रेटिंग असलेले खेळाडू हे व्यावसायिक किंवा प्रशिक्षक असतात. मात्र, बाकलीवाल यांच्या यशाने बुद्धिबळ प्रेमींसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे बुद्धिबळाची लोकप्रियता केवळ व्यावसायिक वर्तुळापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य हौशी खेळाडूंमध्येही वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. अलीकडच्या काळात रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा पारंपरिक क्लासिकल फॉरमॅटच्या तुलनेत अधिक लोकप्रिय होत आहेत, कारण या प्रकारात जलद आणि अधिक रोमांचक खेळाचा अनुभव मिळतो.