जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ३७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन

जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ३७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन
जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ३७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील ३७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
 
शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे धोंडूमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मनिषा सोळंकी, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, पराग वांबुरे, विजय भालेराव यांसह डॉ. संजीव डोळे आदी उपस्थित होते. शिबीरात २१२ विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी व २४६ विद्यार्थ्यांची दंततपासणी करण्यात आली.
 
डॉ. मनिषा सोळंकी म्हणाल्या, मानसिक व शारिरीक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले राहिले, तर सक्षम नागरिक तयार होवू शकतात. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत सातत्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. तसेच संस्कार वर्गाच्या माध्यमातून सुजाण नागरिक देखील घडत आहेत.
 
महेश सूर्यवंशी म्हणाले, लहान मुलांचे डोळे, दात यांसह संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबीरात केली जाते. तसेच या मुलांचे आरोग्यविषयक रेकॉर्ड देखील ठेवले जाते. मुलांनी आहारासोबत व्यायाम देखील करायला हवा. मानसिक तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, हे देखील मुलांना या शिबिराद्वारे सांगण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या १८५ रुग्णालयांशी टायअप असून याद्वारे रुग्णसेवेचे कार्य सातत्याने सुरु आहे.
 
फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील ३७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.