अण्णासाहेब पाटील यांना महामंडळाकडून अभिवादन

अण्णासाहेब पाटील यांना महामंडळाकडून अभिवादन
पुणे, दि. २४: मराठा आरक्षणाचे जनक, माथाडी कामगारांचे भाग्यविधाते, क्रांतीसूर्य कै. अण्णासाहेब पाटील त्यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक संकेत लोहार यांनी विभागीय कार्यालयात 23 मार्च रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
 
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन खोजे, जिल्हा व विभागीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या मराठा महासंघाचे पदाधिकारी, महामंडळाच्या योजनांचे  लाभार्थी उपस्थित होते.