महिला दिन,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन व मनसेचा वर्धापन दिना निमित्त महिलांना मानाची साडी भेट देऊन केला सन्मान

पुणे प्रतिनिधी : जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व मनसेचा वर्धापन दिनानिमित्त वडगाव शेरी या परिसरातील स्वच्छता व साफसफाई करणारे महानगरपालिकेचे महिला कर्मचारी यांना मानाचे साडी तसेच इडली उडीद वडा भेळ बिस्किट च्या मिनरल वॉटर च्या बाटल्या देऊन गौरवण्यात आले
या कार्यक्रमाच्या सत्कार करते वेळेस मनसेचे हेमंत बत्ते म्हणाले आपण आपल्या परिसरात राहत असताना रोजच्या धावपळीमध्ये आपल्या आजूबाजूच्या भागात रोज घाण तसेच कचरा टाकत असतो, पण या भगिनी रोज पहाटे येऊन सर्व आपला परिसर स्वच्छ, साफसफाई करतात स्वतःच्या आरोग्याची विचार न करता समाजातील सर्व थरातील लोकांसाठी ते रोज पहाटेच कामाला सुरुवात करतात अशा लोकांसाठी आपण समाजाचं काहीतरी देण लागतो याचा विचार कोणीच करत नाही म्हणून आम्ही या महिलांसाठी या महिलादिना निमित्त फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन त्यांच्या कौतुक करून आज हा छोटासा कार्यक्रम त्यांच्यासाठी घेण्यात आला्
सर्व महिलांना याबद्दल खूप आनंद वाटला याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य खात्याचे सोमनाथ नगर कोटीचे निरीक्षक श्रीमती सुषमा मुंडे ,श्रीमती पुजा खामकर ,मुकदम समाधान अवघडे ,आनंद गलांडे व त्यांचे सर्व सहकारी व साफसफाई करणाऱ्या महिला वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष हेमन बत्ते यांनी केले हा कार्यक्रमाचे नियोजन मनोज अष्टेकर. उदय खांडके. साईनाथ फालके. कैलास सोनवणे .संतोष शिंदे. हर्षल बत्ते यांनी केले कार्यक्रम व्यवस्थित या कार्यक्रमाचे संयोजन केले. सर्व महिलांना या कार्यक्रमापासून आनंद झाला त्यांनी सर्वांचे आभार मानले .