ठाण्याचे उमेशजी भारती यांची राज्यस्तरीय पदावर गौरवशाली नियुक्ती!

ठाण्याचे उमेशजी भारती यांची राज्यस्तरीय पदावर गौरवशाली नियुक्ती!

ठाणे : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे ठाणे जिल्हा प्रमुख सन्मा. श्री. उमेशजी गोवर्धन भारती साहेब यांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सामाजिक तसेच संघटनात्मक कार्याची दखल घेऊन
सन्मा. ना. श्री. राहुलजी अर्जुनराव दुबाले साहेब
(संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष – महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, महाराष्ट्र राज्य तथा सदस्य, गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती, महाराष्ट्र शासन)
यांच्या हस्ते “युवक आघाडी संघटक – महाराष्ट्र राज्य” या राज्य पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या निर्भिड नेतृत्वाखाली युवकांचे संघटन, संघटनेचे आणि समाजाचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलीस, पोलीस परिवार आणि जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे होईल, असा ठाम विश्वास संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी व्यक्त केला आहे.

उमेशजी भारती यांना हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!