डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्डने प्रा.छाया बोरकर सन्मानित.
४१ वे भारतीय दलित साहित्य अकादमी अंतर्गत १२- १४ डिसेंबर २०२५ ला द्विदिवसीय दलित साहित्य संमेलन दिल्ली येथील पंचशील आश्रम झंडेवालान (रिंग रोड) येथे आयोजित करण्यात आले होते.
या भारतीय दलित साहित्य संमेलनात २२ राज्यातील साहित्यिक, पत्रकार,संशोधक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी सहभागी झाले होते. प्रा.छाया तानबाजी बोरकर यांना त्यांच्या साहित्यिक,शैक्षणिक, सामाजिक,क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्ड २०२५" ने सन्मानित करण्यात आले.
या साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी संघ प्रिय गौतम, भारतीय दलित साहित्य राष्ट्रीय अध्यक्ष एस सुमनाक्षर, भारतीय दलित साहित्य सचिव जय सुमनाक्षर, या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री बबनराव घोलप,राजमंत्री यमनकुमार बावरा, पंजाबचे कलेक्टर अभिषेक मुन,भारतीय दलित साहित्य अकादमी विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. साहित्यिक रवी दलाल, डॉ. व्ही व्ही पोपेरे साहेब, जनरल सेक्रटरी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट राज्य नागपूर तथा (देश रत्न पुरस्कार)आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन व पुरातन विभागाचे इतिहास संशोधक रविद्र शिंदे (धाराशिव) यांच्यासह उपस्थित असून भारतातील २२ राज्यातील अनेक मान्यवरांसह प्रा. छाया तानबाजी बोरकर यांना सन्मानित करण्यात आले.
प्रा.छाया बोरकर यांचे अनेक साहित्य प्रकाशित असून काही साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.