जमाते ए इस्लामी हिंद पुसद तर्फे ईद मिलनाचा कार्यक्रम संपन्न.

सदर कार्यक्रमाची सुरुवात हाफिज खलिल शम्सी यांच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर जमाते इस्लामी हिंद यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष शेख नईम यांनी कार्यक्रमाचा उद्देश हा प्रास्ताविक भाषणात मांडला त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.खासदार संजयभाऊ देशमुख साहेबांनी अशा प्रकारचे कार्यक्रम जे लोकांना जोडण्याचे आहे ते जास्त प्रमाणात घेतले पाहिजे तसेच सर्व धार्मिक लोकं एकत्र येणे ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. त्या नंतर आपले मनोगत व्यक्त करताना मोहिनीताई नाईक यांनी अश्या परिस्थितीत आपल्या पुसद शहरात सद्भाना निर्मितीचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे याकरिता त्यांनी जमाते इस्लामी पुसद चे कौतुक केले. त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉक्टर रफिक पारनेर साहेबांनी आपल्या व्याख्यानात रमजानचा उद्देश माणसाला माणूस बनविणे हा आहे तसेच आजच्या काळात सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मता,नैतिक मूल्य,या सर्व बाबींवर संत साहित्याद्वारे संबोधन केले आज समाजामध्ये जो काही द्वेष पसरत आहे ते कमी करण्यासाठी आज प्रत्येक माणसाने एकत्र येऊन समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्य केले पाहिजे कारण भारतीय संत परंपरा ही खूपच व्यापक आहे.परमेश्वर सर्वांचा आहे.अशा प्रकारचे सदभावनाप्रिय विचार डॉक्टर रफिक पारनेर साहेबांनी आपल्या भाषणात मांडले. या कार्यक्रमात सर्व धार्मिक असंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सैय्यद सलमान सरांनी केले तर आभार प्रदर्शन इद्रिस खान साहेबांनी केले. कार्यक्रमात महिला भगीनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.