“डोंबिवलीत रिक्षाचालकांचा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक!”

दि ११ डोंबिवली ठाणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेत होणाऱ्या वाहतूक विभागाच्या गलथान कारभारा विरोधात दि ११ एप्रिल रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय चौकात डोंबिवलीतील अंकुश म्हात्रे उदय शेट्टी प्रकाश तेलगोटे शाम चौगले सुरज पवार नितीन पवार प्रमोद कांबळे संजय पाटील सर्व रिक्षा चालक मालक पदाधिकारी
युनियन च्या वतीने भव्य रिक्षा बंद आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात विनापरवाना, ड्रेस आणि बॅचशिवाय रिक्षा चालवणाऱ्यांवर पोलिसांची उदासीनता.
वाहतूक विभागाच्या कारवाईअभावी अधिकृत रिक्षाचालकांचे होणारे हाल. डोंबिवलीतील रस्त्यांवरील वाहतूक गोंधळाला प्रशासनाची डोळेझाक या सगळ्याचा निषेध करत रिक्षा युनियनने घेतला ठाम पवित्रा. सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण
संजय साबळे आणि डोंबिवली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी मागण्या मान्य करून त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून स्थगित करण्यात आले.पण… जर आश्वासनाला कृतीची जोड नसेल, तर पुढील आंदोलन आणखी तीव्र असेल असे इशारा देण्यात आले.
शिवसेना, युवासेना, आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात ठाम सहभाग नोंदवत एकजूट दाखवली.