कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अथक संघर्षाला वंदन करून, सामाजिक न्याय हा केवळ नारा न राहता तो वास्तव होण्यासाठी जातीय व वर्गीय लढ्याशी आपली बांधिलकी दृढ करूया!

कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अथक संघर्षाला वंदन करून, सामाजिक न्याय हा केवळ नारा न राहता तो वास्तव होण्यासाठी जातीय व वर्गीय लढ्याशी आपली  बांधिलकी  दृढ करूया!
कांशीरामजी हे परिवर्तन घडवून आणणारे दूरदृष्टी असणारे नेते होते, त्यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय वास्तवाला नवीन दिशा दिली. आंबेडकरी विचारसरणीवर आधारित त्यांच्या नेतृत्वाने बहुजन एकतेचा पुरस्कार केला, त्यांनी जातीय वर्चस्वाला आव्हान देत उपेक्षित समुदायांना राजकीय सशक्तीकरणासाठी संघटित केले.
 
कांशीरामजी यांचे कार्य केवळ सामाजिक अन्यायाविरोधात नव्हते, तर व्यवस्थात्मक शोषण आणि आर्थिक शोषणाविरोधातील व्यापक संघर्षाशी जोडलेले होते. दलित शोषित समाज संघर्ष समिती (DS4) आणि नंतर बहुजन समाज पक्ष (BSP) स्थापन करून, त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या समाजासाठी स्वतंत्र राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्यांच्या मते, वंचित बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाशिवाय खरी लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही.  कांशीरामजींनी जातींचे बहुजन समाजातील अस्तित्व ओळखून त्यांनी जातीय शोषण भारतीय सामाजिक-आर्थिक व्यवस्थेत खोलवर रुजलेले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच त्यांचे राजकारण ब्राह्मणी वर्चस्व मोडून काढण्याबरोबरच दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर वंचित घटकांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यावरही केंद्रित होते.
 
कांशीरामजींच्या नेतृत्वाने प्रस्थापित जातींच्या राजकीय वर्चस्वाला धक्का दिला आणि राजकीय सत्ता मिळवणेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे सिद्ध केले. त्यांनी "जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी" हा नारा देत बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम केले. अद्यापही अनेक वंचित समुदायांना पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 
 
कांशीरामजींच्या दृष्टिकोनानुसार, खरी लोकशाही तीच आहे जिथे प्रत्येक समुदायाला त्यांच्या लोकसंख्येनुसार समान आवाज आणि प्रतिनिधित्व मिळते. आजही, न्याय, सन्मान आणि समान अधिकारांवर आधारित समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी त्यांच्या विचारसरणीने विविध चळवळींना प्रेरणा दिली आहे.
 
कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अथक संघर्षाला वंदन करून, सामाजिक न्याय हा केवळ नारा न राहता तो वास्तव होण्यासाठी जातीय व वर्गीय लढ्याशी आपली  बांधिलकी  दृढ करूया!