मुख्यमंत्री साहेब,"500 चौरस फुटांचे घर देऊ" या तुम्हीच दिलेल्या शब्दाला जागा.--- या साठी तुम्हाला पुन्हा स्मरण पत्र ----प्रा.बी.बी.शिंदे.

पिंपरी --प्रतिनिधी --दि.20/03/2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,आपण उप मुख्यमंत्री असताना शिवाजी पार्क मुंबई येथील महायुतीच्या प्रचार सभेत 14नोहेंबर 2024 रोजी झोपडपट्टी धारकांना, आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यास 500 चौ. फुटांचे घर देऊ, असे आश्वासन व घोषणा केली होती. त्यावेळी आपण उप मुख्यमंत्री होतात. आत्ता आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात.
याची आपणास आठवण करून देण्या
करिता, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष :- भिमरत्न
प्रा.बी.बी.शिंदे.व त्यांचे सहकारी वर्ग यांनी मा.मुरव्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच दोन्ही उप मुख्यमंत्री साहेब, आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई 32 यांना या विषयावर दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी एक लेखी निवेदन देऊन, आपण दिलेल्या आश्वासनाची
पूर्तता करावी, आणि तसा शासन मान्य जी. आर.(परिपत्रक) कडण्यात यावा, या बाबत मागणी केली होती.
या विषयंकित प्रश्नाबाबत साहेब, आपणास विसर पडला की, काय ? म्हणून पुन्हा एक स्मरणपत्र निवेदन आम्ही आपणास व आपल्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्र्यास, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे साहेब, यांना दिनांक 20मार्च 2025
रोजी देऊन आम्ही आपणास आपणच दिलेल्या शब्दास जागा, या बाबत चे स्मरण पत्र दिले.
या स्मरण पत्रासोबत प्रथम दिलेल्या 20जानेवारी
2025 रोजीच्या निवेदनाची प्रत जोडली आहे.
आमच्या या रास्त मागणीच्या निवेदणासोबत जर आमदार, खासदार, यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, आणि वचणास जागा,अशि मागणी केली असती तर ----तुम्ही या बाबत विचार केला नसता काय?
या स्मरण पत्र निवेदन वर सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष :--भिमरत्न,प्रा.बी.बी.शिंदे.,
महा सचिव:--हरिचंद्र शिंदे, कार्याध्यक्ष:--लक्ष्मण
रोकडे, उपाध्यक्ष:-अशोक जावळे,सह संघटक:-रामभाऊ ओव्हाळ,सह सचिव:-- लक्ष्मण सिरसट, उपाध्यक्ष:-- ऍड. रमेश सरोदे, भिमराव ओव्हाळ, विठ्ठल लांडगे, किसनराव सरवदे,तसेच सामाजिक कार्यकर्ते:-- मा.शंकर कुऱ्हाडे,मा.
सागर ओरसे,मा.सुभाष बनसोडे,मा.मोहम्मद शहा,
मा.भिमराव लष्करे, बाळासाहेब शिंदे, गोविंद गाडे,
मा.मुकुंद रणदिवे -रिपब्लीकन सेना.,मा. रमेश कांबळे,रवि कांबळे,मा.रामभाऊ ठोके, अध्यक्ष युवा पँथर सेना, तुकाराम गव्हाणे, दिलीप बनसोडे,गिताराम वाघमारे,प्रभाकर गायकवाड,लक्ष्मण रवरात,संजय ओव्हाळ, प्रल्हाद गायसमुद्रे, सौ.सावित्री शिंदे,सौ.शालन ओव्हाळ,सौ.सुनिता कांबळे,सौ.सुदामती डोंगरे, श्रीमती/ सीमा गजभिये,सौ.रेरवा वाघमारे,मा.सचिन वाघमारे सचिव पिंपरी चिंचवड शहर.
इत्यादी विविध सामाजिक संघटनेच्या, कार्यकर्ते यांच्या सह्या सह स्मरण पत्र निवेदन देवून, झोपडपट्टी वाशियांच्या पुनर्वसनात 500 चौ.फुटाचे
घर मीळावे याबाबत चा जि.आर.(शासन परिपत्रक)
काढण्यात यावे व आपणच दिलेल्या शब्दाला जागुन त्याची पुर्तता करावी.अशि स्मरण पत्रात विनंती करण्यात आली आहे