नवरात्रीचे औचित्य साधून दिनेश अण्णा कुर्हाडे यांनी पालिकेच्या निवडणूकीचे प्रभाग क्रमांक आठ मधून फुंकले रणशिंग..
नवरात्रीच्या मंगल वातावरणात दिनेश अण्णा कुर्हाडे यांची निवडणूक एंट्री
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २ आक्टोबर २०२५ : सलग दहा दिवस नवरात्र उत्सव बालाजीनगर भोसरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी दहा दिवस विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत दांडिया खेळत साजरा करण्यात आला. यात हास्य जत्रा मधील हास्यक्विन शिवाली परब व वनिता खरात या उपस्थित होत्या. दररोज विविध बक्षिसांचे वाटप व शेवटच्यादिवशी म्हणजे दहाव्या माळेला परतीच्या पावसात बक्षिसांचा वर्षाव झाला.
या संदर्भात सविस्तर वृत असे की दररोज महिलांना सहा पैठणी साड्या तीन मुलांना स्मार्टवॉच लहान मुला मुलींना स्कूल बॅग आणि जे प्रेक्षक हा उत्सव पाहायला येतात त्यांना लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक गिफ्ट अतिशय आनंदात दहा दिवसाचा नवरात्र उत्सव कार्यक्रम पार पडला. आणि विशेष म्हणजे मुस्लिम भगिनी दररोज दहा दिवस दांडिया खेळायला व पाहायला येत होत्या. यातून हेच समजते की भेदभाव न करता समस्त बालाजीनगरकरांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त असा प्रतिसादच दिला होता. दररोज रात्री आठ ते दहा यावेळेत रास गर्भा, दांडिया खेळला जात होता आयोजकांची कार्यक्रमावरील उपस्थितांवरील नियोजनाची पकड पाहून मान्यवर थक्क झाले.
नियोजनबद्ध कार्यक्रम व दिनेश आण्णा कुऱ्हाडे यांचे व सहकार्यांचे कौतूक करावे तितके कमीच ठरेल. दिवसोंदिवशी कार्यक्रमाला लोकांची
तुफान गर्दी वाढत होती. पत्रकार बांधवांना ही यावेळी सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांना या दहा दिवसांत दररोज सन्मानित करण्यात येत होते. काल दहाव्या माळेला पोलिस प्रशासनाने रात्री १२ पर्यंतचा वेळ दिला होता.
यावेळेचा सदोपयोग करत बक्षिस वितरण झाले यात दांडिया विजेत्यांना प्रथम बक्षीस फ्रीज, द्वितीय बक्षिस वाॅशिंग मशिन, तृतीय बक्षिस एलईडी टीव्ही, चतुर्थ बक्षीस स्मार्टफोन, पाचवे बक्षीस होम थिएटर, सहावे बक्षीस गॅस शेगडी, सातवे बक्षीस मिक्सर अशी विविध बक्षिसे देवून दांडिया प्रेमी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी आवर्जून दिनेश आण्णा कुऱ्हाडे यांच्यावतिने पोलिस प्रशासनास धन्यवाद व्यक्त करण्यात आले. तसेच यांनी सर्व नागरिकांना दसऱ्याच्या व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या.
यावेळी प्रतिष्ठित नागरिक प्रसिद्ध उद्योजक गोल्डमॅन श्री. शंकर शेठ कुऱ्हाडे, पिंटूभाऊ जाधव, सागरभाऊ ओरसे, सुनीलभाऊ वाघमारे, मोहम्मदभाई शहा, शेखलालभाई नदाफ, चांदभाई शेख, राजू शेठ पठाण, रामांना विटकर, भीमाशेट लष्करे, दुर्गादास जाधव, सदा कुसाळे, राजू गुंजाळ, कामराज विटकर, लक्ष्मण विटकर, लालाभाऊ जाधव, अभिमान तांगडे, बाळू शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीनाताई तांगडे, सौ. शालनताई सूर्यवंशी, जयश्रीताई मस्के, मनीषाताई बनसोडे, व सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार व समस्त बालाजी नगर व आसपासचे समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.