पुणे जिल्ह्यात जागतिक पर्यटन दिन विविध उपक्रमाने साजरा
पुणे, दि. २९, (जिमाका वृत्तसेवा) : - संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटने मार्फत दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा केला जातो. यानिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे पुणे विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री वीर शिवाजी पासलकर विद्यालय, पानशेत - ४० विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजपूर (भिमाशंकर) - ४० विद्यार्थी , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कार्ला - ५० विद्यार्थी सहभागी होते. अशा एकूण १३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांना प्रमापत्राचे वितरण करण्यात आले.
पर्यटकांच्या स्वागतासाठी रिसॉर्टमध्ये पारंपरिक स्वागत समारंभ, ट्रेकिंग उपक्रम व स्थानिक खेळांचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्व संध्येला पर्यटन विषयक वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये ‘पर्यटन व शाश्वत परिवर्तन’ या विषयावर डॉ. श्री संजीव मित्तल यांनी व्याख्यान दिले. तसेच श्री कृष्णानंद माळी यांनी ग्रामीण पर्यटनाविषयी माहिती दिली. या वेबिनारमध्ये सुमारे ८० जणांनी सहभाग घेतला.
या उपक्रमांमधून पर्यटन, पर्यावरणपूरक प्रवास, स्थानिक परंपरा व संस्कृती याबाबत जनजागृती घडून आली. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने मोबाईल फोनव्दारे महामंडळाच्या निवासस्थानांचे आरक्षण करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सर्व पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि इच्छुक पर्यटकांनी श्रीमती दिपाली गुजर - 9689136791, सिध्देश तुंगतकर - 7796590375 यांच्याशी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10.00 ते सायं. 06.00 पर्यंत संपर्क करावा असे , आवाहन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ , पुणे हनुमंत कु. हेडे यांनी केले आहे.