पिंपळे गुरव मध्ये बिगारी कामगाराच्या झोपडीला आग, ५ लाख ७० हजारांची रोकड जळून खाक

पिंपळे गुरव मध्ये बिगारी कामगाराच्या झोपडीला आग, ५ लाख ७० हजारांची रोकड जळून खाक

पिंपळे गुरव:-पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात बिगारी कामगारांच्या झोपडीला आग लागून, ५ लाख ७० हजारांची रोकड जळून खाक झाली आहे. या आगीत साडे चार तोळे सोन्याचे दागिने देखील आगीच्या विळख्यात सापडले आहेत.
पिंपळे गुरव परिसरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीत आज सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. या कामगारांच्या झोपडीत मुकादम करीआप्पा गुंडापुर हा देखील राहत होता. त्याच्या झोपडीत कामगारांना पगार वाटपासाठी आणलेली ५ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.