क्रूरतेचा कळस! वसईच्या बीचवर तरूणीवर बलात्कार, ब्लेडने हल्ला; गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही...

क्रूरतेचा कळस! वसईच्या बीचवर तरूणीवर बलात्कार, ब्लेडने हल्ला; गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही...
मुंबईसह महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढू लागल्या आहेत. मुंबईच्या वनराई पोलिसांनी देखील अशाच एका गुन्ह्याची उकल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. राजरत्न सदाशिव वाळवळ 32 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
सध्या आरोपी वनराई पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी च्या रात्री पीडित तरुणीही वसई समुद्रकिनाऱ्यावर एकटीच बसली होती. याच संधीचा फायदा घेत रिक्षावाल्याने तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपीकडून तिच्या गुप्तांगावर दगडाने घाव घालण्यात आले. शिवाय सिझरियन ब्लेडने देखील वार केले. यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली. याच अवस्थेत ती वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली. मात्र ती तरुणी रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, याबाबतची माहिती त्यांनी वनराई पोलिसांना दिली.
 
 
वनराई पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मुलीला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आणले. पीडीतेला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर घडलेला सर्व प्रकार तिने सांगितला. यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीचा आलेला अहवाल आणि पिडीतेचा जबाब यावरून वनराई पोलिसांनी अज्ञात रिक्षावाल्या विरोधात कलम 64 (2) (एम) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला.
 
 
गुन्ह्याचे गांभीर्य पाहून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाच्या तपासाकरीता परिमंडळीय पथके तयार करण्यात आली. पीडित मुलीकडून प्राप्त त्रोटक माहितीच्या आधारे विरार ते चर्चगेट रेल्वे परिसर, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे कोणालाही पोलिसांनी आरोपीला वालीव खैरपाडा येथील झोपडपट्टी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.