दिनांक ०६/०२/२०२५ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा, पुणे येथे मा.श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशनकडील विविध गुन्हयांतील किंमती मुद्देमाल फिर्यादी यांना वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये परिमंडळ ४ कार्यक्षेत्रातील एकुण १० पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या कलमां नुसार दाखल असलेल्या गुन्हयातील १०१ फिर्यादी यांचा हस्तगत करण्यात आलेला एकूण कि.४,८६,५६,२०६/- (चार कोटी, शहाऐंशी लाख, छप्पन्न हजार, दोनशे सहा रुपये) रुपये किंमतीचा जमा असलेला व मा. न्यायालयाने आदेशीत केलेला, तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता सन २०२३ चे कलम १०६ मधील तरतुदी नुसार देय असलेला किंमती मुद्देमाल संबंधीत फिर्यादीना परत करण्यात आलेला आहे. वितरण करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने, मोबाईल फोन, लॅपटॉप, सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम इ. चा समावेश आहे.
सदर कार्यक्रमास श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री अरविंद चावरिया, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे शहर, श्री शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्री हिंमत जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. विठ्ठल दबडे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग व परिमंडळ ४ कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आयोजित केलेला आहे.