प्रतिभानगर नगर येथील बंद घराचे खिडकीचे गज कापुन घरफोडी करणा-या चोरट्यास अटक.

प्रतिभानगर नगर येथील बंद घराचे खिडकीचे गज कापुन घरफोडी करणा-या चोरट्यास अटक.

कोल्हापूर प्रतिनिधी :- 02 वर्षापुर्वी झालेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी.
श्री. दिलीप गोपाळराव कदम, रा. लक्ष्मीशंकर बंगला, स्टेट बैंक कॉलनी प्रतिभा नगर, कोल्हापुर हे आपेल राहते घरास कलुप लावून दिनांक 06/04/2022 रोजी मुलग्याकडे राहणेस गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून TCL कंपनीचा 43" एलईडी टी. व्ही. व दोन घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरून नेलेबाबत राजारामपूरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 197/2022 भा.द.वि.स.क. 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेस संपुर्ण जिल्ह्यामध्ये घडलेल्या घरफोडी चोरीचे गुन्ह्यांसह मालाविरुध्दचे गुन्ह्यांचा समांतर तपास करणे बाबत आदेशित केले होते. मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करून नमुद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, प्रतिभानगर येथील बंगल्याचे खिडकीचे गज कापून झालेली चोरी माधव नगर येथील अभिजीत कांबळे याने व त्याचा एक साथीदार यांनी केली असून घरातून चोरलेला टी. व्ही. व गैस टाक्या त्याचे घरामध्ये ठेवलेल्या आहेत. अशी माहिती मिळालेने नमुद तपास पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा लावून अभिजीत विकास कांबळे, वय 27 वर्षे, रा. माधव नगर, कणेरीवाडी, ता. करवीर यास पकडून त्याचे घराची घरझडती घेतली असता त्याचे घरामध्ये किचनच्या लॉप्टवर ठेवलेली TCL कंपनीचा 43" एलईडी टी.व्ही. व दोन घरगुती गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या असा एकूण 31,000/- रू. किंमतीचा माल मिळून आला त्याबाबत आरोपीत याचेकडे विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार राहुल देवकर, रा. बत्तीसशिराळा जिल्हा सांगली असे दोघांनी मिळून गेली दोन वर्षापुर्वी प्रतिभानगर येथील बंद असले बंगल्याचे खिडकीचे गज कापून चोरी केली असल्याची माहिती दिली. मिळून आले मालाबाबत माहिती घेतली असता सदरचा माल राजारामपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. 197/2022 भा.द.वि.स.क. 454, 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला असल्याची खात्री झाली. नमुद आरोपीस जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता राजारामपूरी पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास पोलीस ठाणेकरवी सुरु आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, परशुराम गुजरे, संतोष बरगे, विशाल खराडे, प्रविण पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती यांनी केली आहे.