प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल

(मुंबई प्रतिनिधी)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार यांनी देशातील जनतेचे आरोग्य, सुरक्षा ,अन्न योजना ,रस्ते, इत्यादी बाबत अनेक महत्वाची कामे केले असून ती जनतेपर्यंत पोहोचवा.17 सप्टेंबर ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जन्म तारीख व 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधी यांची जयंती असून दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा सेवा पंधरवडा या काळात लोकांची विविध कामे करून हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे पार्टीने ठरविले आहे.लोकांची कामे करा, लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि त्यांना मदत करा हर घर स्वदेशी घर घर स्वदेशी हा मोदीजींचा संदेश घरोघरी पाठवा, असे आवाहन उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री गोयल पियुष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केली, ते उत्तन येथून केशव सृष्टी म्हाळगी प्रबोधिनी संकुलात भाजपा उत्तर मुंबई चारकोप,दहिसर विधानसभा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गाला संबोधित करीत होते, उत्तर मुंबईत संसद खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार असून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना विविध खेळासाठी निमंत्रित करा, एक लाख खेळाडूंना प्रमाणपत्रे
देऊन त्यांना प्रोत्साहन देऊ, यावेळी किमान दोन हजार युवकांना काम मिळेल.उत्तर मुंबईत जिथे जिथे गार्डन आहे त्याचा विकास करून स्थानिक संस्थेकडे ते देखभालीसाठी सुपूर्द करू,जनतेच्या आरोग्यासाठी बोरिवली येथे एक हजार बेडच्या दोन हॉस्पिटलचे काम सुरू असून ते जनतेसाठी लवकरच उपलब्ध होतील, उड्डाणपूल खालील जागेची साफसफाई करून तेथे मुलांना गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण मिळेल अशी सोय करू. मोदी सरकारने जीवनावश्य सर्वच वस्तूवरील जीएसटी कमी केली असून त्यामुळे जनतेला खुपच दिलासा मिळाला आहे,हे जनतेपर्यंत पोहोचवा, येणाऱ्या काळात उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी राज्यात सुरू असलेली अनेक लोकोपयोगी कामांचा उल्लेख केला व विरोधक करीत असलेल्या खोट्या आरोपाचा समाचार घेतला,मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबईला भाजपचा महापौर देण्यासाठी सगळ्यांनी काम करावे असे आमदार योगेश सागर यांनी सांगितले,या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळा तावडे नगरसेवक कमलेश यादव, नगरसेविका लीना देहरकर,प्रियांका मोरे,व इतर पदाधिकारी उपस्थित होते
अशी माहिती गिरिधर साळुंके उपाध्यक्ष भाजपा उत्तर मुंबई यांनी दिली