पनवेल महानगरपालिकेतर्फे दिव्यांग शिबिराचे आयोजन

पनवेल महानगरपालिकेतर्फे दिव्यांग शिबिराचे आयोजन

पनवेल,दि.२७: पनवेल महानगरपालिका तर्फे रोडपाली सेक्टर-19 येथे दिनांक 26 सप्टेंबर, शुक्रवार रोजी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात  युडीआयडी (UDID) कार्ड नसलेल्या दिव्यांगांना नवीन कार्ड काढून देण्यात आले, तसेच दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणीचा करण्यात आली.

या दिव्यांग शिबिरास एकुण ६७ दिव्यांग बांधव उपस्थित होते. या शिबिरात १२ दिव्यांगाचे युडीआयडी कार्ड अपडेट करुन डाऊनलोड करुन  करून देण्यात आले. तसेच ३२ 
नवीन दिव्यांगांच्या युडीआयडी कार्डसाठी रजिस्ट्रेशन  करण्यात आले. यावेळी वैद्यकीय विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली.तसेच आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली.

यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, दिव्यांग विभाग प्रमुख हरेश जाधव, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
 
शिबिरामध्ये सहभागी बांधवांसाठी चहा-पाणी व नाश्त्याची सोय देखील करण्यात आली होती.

चौकट 
राज्य शासन, केंद्र शासन तसेच पनवेल महानगरपालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध दिव्यांग कल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड आवश्यक आहे. या उपक्रमाद्वारे दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अधिक सुलभता मिळणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी सांगितले.