आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’

आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’
( मुंबई प्रतिनिधी रूपाली बैसाणे) 
 
 मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज प्रत्यक्ष मुंबईकरांना भेटून मोहीम राबवली 
 
देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मा.  नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार तसेच महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंबईकरांच्या स्वप्नातील मुंबई साकारण्यासाठी मुंबई भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे पहाटे 6 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 
सदर कार्यक्रमास स्थानिक नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांनी QR कोड स्कॅन करून मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सूचना तसेच मार्गदर्शनाची नोंद गुगल फॉर्ममध्ये केली.
 
या वेळी माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, प्रकाश दरेकर, सरचिटणीस आप्पा बेलवलकर, निखिल व्यास, माजी नगरसेवक शिवकुमार झा, भाजपा मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना, उत्तर मुंबईच्या प्रसिद्धी प्रमुख निलाबेन सोनी, शिवाजी चौगुले, अमित उतेकर, अविनाश राय, विधानसभा संयोजक कृष्णकांत दरेकर,तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 
तसेच येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून, मुंबई शहर पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि सुंदर, स्वच्छ, सुरक्षित मुंबईच्या निर्मितीसाठी तमाम नागरिकांचे अभिप्राय घेतले. "आज पार पडलेले हे अभियान आणि त्यात नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग, मुंबईतील नव्या बदलाचे संकेत देणारा ठरला," असे ही यावेळी मुंबई अध्यक्ष आ.अमित साटम यांनी सांगितले.