बचत गटांच्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सुरू*
बचत गटांच्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सुरू*
*बचत गटांच्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सुरू*
पनवेल,दि.7 : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिकेच्यावतीने बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे उदघाट्न आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी उप महापौर प्रमिला पाटील यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आले.यावेळी महापालिका सदस्य दर्शना भोईर, मोनिका महानगर, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, उपायुक्त मंगला माळवे, सहायक आयुक्त डॉ.रूपाली माने, अधिक्षक कविता मोकल, डेएनयुएलएमचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रातील महिलांना स्वावलंबी व सशक्त बनवण्यासाठी, व्यवसायिक व सामाजिक कौशल्य वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महापौर नितिन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन शनिवार, रविवार सोमवार तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या बचत गटाच्या उत्पादन मेळाव्यामध्ये खाद्यपदार्थ, दागिने, लोकरीच्या वस्तू, मोत्याच्या वस्तू, बेडशीट, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने , साड्या, सुवासिक उदबत्ती अशा विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे केले आहे.