बाप देव मंदिर परिसर, पनवेल येथे वृक्षारोपण

बाप देव मंदिर परिसर, पनवेल येथे वृक्षारोपण

 पनवेल,दि.12 : पनवेल महानगरपालिका उद्यान विभाग आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंच, इंडियन ऑइल  यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षरता दिनाच्या निमित्ताने नुकताच "वृक्ष संवर्धन साक्षरता दिन साजरा करण्यात आला" या अंतर्गत ‘माझे झाड’ अभियान राबविण्यात आले. शंभर बहुवार्षिक वृक्ष या अभियानाद्वारे रुजवली जाणार आहेत.

 या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार  विक्रांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे आणि सहकारी, इंडियन ऑईलचे अधिकारी, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयुक्त  मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे  आणि  उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा आणि नागरिकांना मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सुरू आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी पिंपळ, बकुळ, ताम्हण, जांभूळ, बदाम, पेरू, आवळा अशा विविध 15 रोपांचे वृक्षारोपण केले.

 लोकसहभागातून वृक्षारोपणाचे प्रमाण वाढवण्यासाठी  सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने, विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान पर्यवेक्षक सिद्धार्थ कांबळे, अशोक मुने तसेच सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक किरण गायकवाड, गजलक्ष्मी आंबे, अजय डांगरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.