बावधन येथे 'भीम जयंती महोत्सव 2025' उत्साहात संपन्न

बावधन येथे 'भीम जयंती महोत्सव 2025' उत्साहात संपन्न
होम मिनिस्टर स्पर्धेत पूनम धनंजय साळवे ठरल्या विजेत्या; विकास प्रतिष्ठान आणि सुजाता महिला मंडळाच्या वतीने आयोजन
 
पुणे :  विकास प्रतिष्ठाण बावधन, सुजाता महिला मंडळ  यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134  व्या जयंती निमित्त तीन दिवाशीय  'भीम जयंती महोत्सव 2025' चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

 
महोत्सवाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांच्या हस्ते,  आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वराज कांबळे आणि मुख्य आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)  युवक आघाडीचे प्रदेश संघटक उमेश कांबळे,  माजी  नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेवक किरण दगडे पाटी, लमाजी सरपंच वैशाली कांबळे,  दत्ता जाधव पाटील, तुषार दगडे पाटील . निलेश दगडे पाटील, गोविद  निकाळजे, स्वप्नील दगडे पाटील,  विजय दगडे पाटील  आदि उपस्थित होते.

 

 
महोत्सवाची सुरुवात भीमस्पंदन  या सांस्कृतिक भीम गीतांच्या कार्यक्रमाणे झाली.  या नानंतर  न्यू होम मिनिस्टर हा सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर आयोजित महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता, यामध्ये पहिल्या क्रमांकाचे दुचाकी चे प्रथम पारितोषिक पूनम धनंजय साळवे यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दक्षणा देढे यांनी पटकावले.  या कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला त्या सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या.

 
 तर 14 एप्रिल रोजी एसबीआय बँक एनडीए रोड ते सिद्धार्थ नगर बावधन बुदुक दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधिकारी अनिल विभूते यांच्या हस्ते झाला. महोत्सवातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सुजाता महिला मंडळच्या  रेखा सरोदे (अध्यक्ष), आशा भालेराव (उपाध्यक्ष), मंगल कांबळे (सेक्रेटरी), छाया कांबळे (खजिनदार), वर्षा कांबळे (कार्य अध्यक्ष) यांच्यासह युवा नेते यशराज कांबळे,प्रेम कांबळे (उत्सव कमिटी अध्यक्ष),  सुजल नितवणे (उपाध्यक्ष),  रोशन खाडे(खजिनदार), सम्राट लालसरे, चैतन्य कुंदन यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.