भाजप गोंदिया नगरपरिषद विकास आघाडीचे गटनेते म्हणून विवेक दिनेश मिश्रा यांची निवड

भाजप गोंदिया नगरपरिषद विकास आघाडीचे गटनेते म्हणून विवेक दिनेश मिश्रा यांची निवड
( विशेष प्रतिनिधी रूपाली बैसाणे)
गोंदिया, ३० डिसेंबर
स्थानिक नगर परिषद निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे १८ सदस्य विजयी झाले. यासोबतच निर्दलीय म्हणून निवडून आलेले रिंकू आसवानी आणि पिंटू माने—या दोन्ही सदस्यांनी भाजपला समर्थन जाहीर केले. परिणामी भाजप आणि समर्थक अपक्षांचा एकूण २० सदस्यांचा गट तयार होऊन भाजप गोंदिया नगरपरिषद विकास आघाडी नगरपरिषदेतील सर्वात मोठा गट ठरला आहे.
या सर्व नगरसेवकांची बैठक मंगळवार (दि. ३०) रोजी गोंदिया येथे आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर गठित आघाडीचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
 
बैठकीत भाजपच्या गटनेता पदासाठी विवेक दिनेश मिश्रा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्षा सीताबाई रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, संपर्क मंत्री वीरेंद्र अंजनकर, दीपक कदम, शिव शर्मा, बेबी अग्रवाल, महामंत्री सुनील केलनका, पंकज रहांगडाले, घनश्याम पानतावने यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.