तिसरे अ.भा.मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलनात प्रा.छाया बोरकर याचे पुस्तकं प्रकाशन..
तिसरे अखिल भारतीय साहित्य संमेलन रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी गोंदिया, येथे संथागार सामाजिक भवन येथ पार पडले. त्यावेळी या साहित्य संमेलनात "मी साईत्रि बोलता..!! आणि
आणि "शेर शिजला इस्तो इजला " या झाडी बोलीतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.झाडीबोली माय बोली टिकून रहावी या उद्दशाने प्रचलित असणारी आणि रोजच्या बोलण्यातून येणारे प्रचलित शब्दातून विचारमंथनाची मांडणी केली आहे.हे विचारमंथन वास्तविक परिस्थितीला अनुसरून असून ते जीवनातील सत्ये प्रदर्शित करत असून परिवर्तन वादी आहे. अशा या पुस्तक प्रकाशना वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ.खुणे,.तर संमेलना अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रवि दलाल, स्वागत अध्यक्ष प्रिया खाडे सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक युवराज मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. उमा गजभिये गोंदिया, डॉ.विजये मारोतकर नागपूर,संचालीका, शारदा बडोले,गोंदिया साहित्यिका क्षितिजा सजीव बापट गोंदिया, साहित्यिका उषा घोडेश्वर गडचिरोली,डॉ. गोविंद चौधरी नांदेड, आणि समस्त महाराष्ट्रातील अनेक नामांकित साहित्यिक आणि कवीच्या उपस्थितीत हा
पुस्तक प्रकाशन
सोहळा पार पडला