पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा आजपासून दोन दिवसांचा हिंगोली दौरा

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा आजपासून दोन दिवसांचा हिंगोली दौरा

हिंगोली, दि. 13 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्टपासून दोन दिवस हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री झिरवाळ हे शुक्रवारी रात्री 8 वाजता नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील. रात्री 9.30 वाजता हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होऊन मुक्काम राहणार आहे.

शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्कार वितरण, जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच आरोग्यवर्धिनी बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 11.30 वाजता खेडेकर सुपर स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअरच्या शुभारंभ कार्यक्रमास पालकमंत्री उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता त्यांची वेळ शासकीय विश्रामगृह येथे राखीव ठेवण्यात आली आहे.

दुपारी 1.30 वाजता शिरडशहापूर येथे आगमन झाल्यानंतर 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान समारोहास ते उपस्थित राहतील. त्यानंतर शिरडशहापूर येथून वारंगा फाट्याकडे प्रयाण करून दुपारी 3 वाजता वारंगा फाटा येथे आगमन होईल. यावेळी ते कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत.

दौऱ्याच्या शेवटी दुपारी 3.30 वाजता पालकमंत्री झिरवाळ हे वारंगा फाटा येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.