खारघर, नवीन पनवेलमधील डायलिसिस सेंटरच्या कामाची पाहणी

पनवेल, दि. २२ सप्टेंबर : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खारघर आणि नवीन पनवेल येथे सुरू असलेल्या डायलिसिस सेंटरच्या कामांची अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी पाहणी केली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून केंद्रे लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

खारघर सेक्टर ३६ मधील प्लॉट क्रमांक १७ आणि नवीन पनवेल सेक्टर ६ मधील जी १ येथे प्रत्येकी २५ खाटांची अत्याधुनिक डायलिसिस युनिट उभारण्यात येत आहेत. महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू आहेत.

या दोन्ही केंद्रांमध्ये आयसीयू दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक डायलिसिस मशिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रात तीन शिफ्टमध्ये दररोज १०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असेल. दोन्ही केंद्रांमधून दररोज २०० रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा मिळणार आहे. त्यामुळे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

या केंद्रांमध्ये नेफ्रोलॉजिस्ट, डायलिसिस डॉक्टर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि परिचारिका कार्यरत असतील. प्रत्येक केंद्रातील २५ खाटांपैकी पाच खाटा संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांसाठी, दोन खाटा गर्भवती महिला व बालकांसाठी आणि दोन खाटा पालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कामोठे येथील मलनि:सारण केंद्रांतर्गत उभारण्यात येत असलेल्या १५ दललि क्षमतेच्या पाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्राच्या कामाचीही अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी केली. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

पाहणीवेळी मुख्य अभियंता राजेश कर्डिले, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, अभियंते प्रीतम पाटील व दिलीप बोकाडे, कनिष्ठ अभियंता महेश वाघमारे, विद्युत विभागप्रमुख किरण जाधव तसेच संबंधित सल्लागार व ठेकेदार उपस्थित होते.