महिला व बालविकास राज्यमंत्री ना मेघना बोर्डीकर यांची सतर्कता

महिला व बालविकास राज्यमंत्री  ना मेघना बोर्डीकर यांची सतर्कता

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाची यशस्वी मोहीम: 29 विवाह थांबवले
 ‘अक्षय्य तृतीया’ या पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या सणाच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. परंतू, याच मुहूर्तावर अनेक ठिकाणी बालविवाह होण्याचे प्रकारही समोर येतात. या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात एकूण 29 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि समन्वयाबाबत ‘निर्मल भवन’ येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, राज्यातील सर्व  जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध जिल्ह्यांतील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले. बैठकीत बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.