मुंढवा एबीसी रोड वरील हॉटेल लोकल बार मध्ये फ्रि स्टाईल हाणामारी करणा-या तरुणांवर पोलीसांकडुन गुन्हा दाखल आणि हॉटेल लोकल बार सिल

पुणे :- मुंढवा पोलीस ठाणे येथे दिनांक ०१/०२/२०२४ रोजी रात्रौ हॉटेल लोकल बार, कपिला मॅट्रीक्स् बिल्डींग, एबीसी रोड, मुंढवा, पुणे येथे ग्राहकांमध्ये वाद झाल्याने त्यातील काही ग्राहक हे मुंढवा पोलीस ठाणे येथे आले. ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी होणे करीता ससुन हॉस्पिटल वाठिकाणी पाठविले. तद्नंतर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावर जावून पाहणी व खात्री केली तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता दि.३१/०१/२०२५ रोजी. हॉटेल लोकल बार, कपिला मॅट्रिक्स् बिल्डींग, एबीसी रोड, मुंढवा, पुणे या ठिकाणी दोन ग्रुप मधील एकुण ५ ते ६ तरुणांमध्ये मोबाईल मध्ये व्हीडीओ काढल्याच्या कारणावरुन वाद होवुन एकमेकांना हाणामारी केल्याची माहीती मिळाली. सदर तरुणांच्या फ्रि स्टाईल हाणामारीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असुन दोन्ही ग्रुप मधील कोणीही उपचार घेवुन तक्रार देणे कामी आले नाही. म्हणुन पोलीसांनी सदर ठिकाणी केलेल्या चौकशी व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी वरुन दोन ग्रुपने एकमेकांना धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचे निदर्शनास आल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने पोलीसांनी सरकार तर्फे फिर्याद देवुन दोन्ही ग्रुप विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १८९(२),११५ (२) प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. सदर घटनेबाबत तात्त्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांना माहीती दिली असता त्यांनी हॉटेल लोकल बार सील केलेले आहे. तसेच मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर यांनी सदर हॉटेलचा खाद्य परवाना रद्द करण्याची कारवाई सुरु केली आहे.
एबीसी चौक ते ताडीगुत्ता चौक यादरम्यान असलेल्या सर्व हॉटेल्स/बार चालक यांना मा.पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडुन आव्हान करण्यात येत आहे की, अशा प्रकारची हॉटेल्स / बार मध्ये कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होणारे वाद वारंवार होत असतील तर संबंधित हॉटेल/बार यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री. डॉ. राजकुमार शिंदे, यांचे सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर श्री. निळकंठ जगताप, हे पुढील तपास करीत आहेत.